S M L
  • दुष्काळावरही राजकीय कुरघोडी ?

    Published On: May 4, 2013 02:51 PM IST | Updated On: May 15, 2013 12:41 PM IST

    आशिष जाधव, मुंबई04 मेराज्यात दुष्काळ तीव्र होत असताना....त्याचं त्याभोवतीचं राजकारणही तापतंय. दुष्काळ निवारणाच्या कामांचं श्रेय काँग्रेसलाच मिळतंय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातल्या महानंद डेअरीने दुष्काळी भागातल्या चारा छावणींमध्ये तब्बल 400 लाख किलो पशुखाद्य मोफत वाटण्याची योजना सुरू केलीय. राष्ट्रवादी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतंय, अशी तक्रार आता काँग्रेसने केली आहे. भीषण दुष्काळात चारा छावण्यांमधल्या गुरा-ढोरांनाही पुरेसा चारा आणि पशुखाद्य मिळेनासा झालाय. त्यामुळे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून महानंद दूध डेअरीनं सर्व चारा छावण्यांवर मोफत पशुखाद्य पुरवण्याची योजना सुरू केली. पण ही योजना राबवण्यामागे मोठं राजकारण दडलंय. राज्यातल्या दुष्काळ निवारणाची कामं काँग्रेसच्या मदत आणि पुनर्वसन खात्याकडून राबवली जात आहे. त्याचं सर्व श्रेय अर्थातच काँग्रेसला मिळतंय. त्यामुळेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एप्रिल महिन्यात राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची दिल्लीत बैठक घेऊन नामी तोडगा शोधून काढला आणि गुजरातमधल्या मेहसाणा दूध संघ, अमूल डेअरी, साबर डेअरी आणि इफ्फको सारख्या संस्था महाराष्ट्राच्या मदतीला धावून आल्या.मेहसाणा दूध संघ, अमूल डेअरी आणि साबर डेअरीकडून 22,500 मेट्रिक टन आणि इफ्कोकडून 18,00 मेट्रिक टन पशुखाद्य मोफत देण्यात आलंय. हे एकूण 400 लाख किलो पशुखाद्य राष्ट्रवादीकडील महानंद डेअरीमार्फत चारा छावण्यांपर्यंत पोहोचवलं जातंय.महानंद डेअरीवर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांचं वर्चस्व आहे. या योजनेच्या जाहिरातींमधून महानंद डेअरीने दुष्काळ निवारणाचे सर्व श्रेय शरद पवारांना देऊन टाकलं. पण शरद पवारांच्या या गुजरात कनेक्शनची माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना दिली. त्यामुुळे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शरद पवारांबरोबरची दुष्काळाची बैठक पुढं ढकलल्याची चर्चा आहे. मे महिना सुरू झाल्यामुळे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चाललीये. आणि त्यातच दुष्काळ निवारण्याचं श्रेय मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कुरघोडी सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close