S M L
  • दुष्काळावरून राज ठाकरेंनी आझमींना फटकारले

    Published On: May 4, 2013 04:28 PM IST | Updated On: May 15, 2013 12:40 PM IST

    04 मेदुष्काळाच्या मुद्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात चांगलीच जुंपलीय. राज दुष्काळाचं राजकारण करताय, एक दोन टँकर दिल्यानं दुष्काळ हटत नाही असा टोला अबू आझमी यांनी राज ठाकरेंना लगावला होता. त्यावर राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलंय. हे बाहेरच्या राज्यातून आलेली लाचार माणसं आहेत. यांच्याकडे आयुष्यभर दुष्काळ पडलेला आहे, म्हणून इथं खायला आली आहेत अशा शब्दात राज यांनी अबू आझमी यांना चांगलेच सुनावले आहे. राज ठाकरे यांनी राज्यात मनसेकडून उभारण्यात आलेल्या चारा छावण्या पाहणीच्या दौरा सुरू आहे. राज ठाकरे महाराष्ट्र दौर्‍यावर असताना कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना दुष्काळग्रस्तांना मदत करा, पक्षाकडून लागेल ती मदत केली जाईल असे आदेश दिले होते. राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी चारा छावण्या उभारून दुष्काळग्रस्तांना मदत केली. एकीकडे दुष्काळग्रस्तांना अनेक जण आपल्या परीने मदत करत आहे मात्र नको त्या विषयावर राजकारण करण्याचा विषयचं नाही असंही राज ठाकरेंनी ठणाकावून सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close