S M L
  • केंद्रात परतणार नाही -मुख्यमंत्री

    Published On: May 10, 2013 01:52 PM IST | Updated On: May 11, 2013 12:38 PM IST

    10 मेमी दिल्लीला परत जाणार ही बातमी खोटी आहे. मी राज्याचं मुख्यमंत्रीपद सोडून केंद्रात परत जाणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. मी दिल्लीला गेलो होते हे खरं आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटही झाली पण ही भेट राज्याचा आढावा घेण्यासंदर्भात झाली होती. नंतर पंतप्रधानांसोबतही बैठक झाली होती. पण याबाबत आपली कुणाशीही चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री स्पष्ट केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केंद्रात परत जाणार आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार अशा आशयाची बातमी एका प्रमुख दैनिकांनी प्रसिद्ध केली होती. आज एलबीटी प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close