S M L

अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे

26 एप्रिलमुंबई : गेल्या चार दिवसांपासून संपावर गेलेल्या मार्डच्या डॉक्टरांनी अखेर संप मागे घेतला आहे. आमच्या मागण्या 100 टक्के पूर्ण झालेल्या नाहीत. मात्र दुष्काळ संपल्यानंतर मागण्या पूर्ण करण्याचं वैद्यकीत मंत्री विजयकुमार गावित यांनी आश्वासन दिल्यामुळे संप मागे घेत असल्याचं मार्डचे अध्यक्ष डॉ.संतोष वाकचौरे यांनी जाहीर केलं. तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत संपात मोठी फूट पडली. गुरूवारी पुण्यातील डॉक्टरांनी संपातून बाहेर पडले तर आज राज्यभरातील 2,800 डॉक्टरांनीही संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपातली हवा निघून गेली. विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं बेमुदत संप पुकारला होता. 6 हजारांचा भत्ता वाढवून 15 हजार करण्यात यावा आणि हा भत्ता 2009 पासून द्यावा, निवासी डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी, मेडिकलच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी 10 टक्के फी वाढ आणि केंद्र सरकारची सेंट्रल रेसिडेंसी योजना निवासी डॉक्टरांना लागू करावी अशा मागण्यासाठी हा संप पुकरण्यात आला होता. या पैकी काही मागण्या मान्य केल्या. यात सरकारने 5 हजारांचा भत्ता वाढवून देण्याचा निर्णय घेतला. तर सुरक्षेसाठी उपयोजना केल्या जातील असं आश्वासन दिलं होतं. इतर मागण्या अमान्य करण्यात आल्या. मात्र मार्डने सरकाराचा निर्णय अमान्य केला. आणि संप सुरूच ठेवला. या संपामुळे राज्यतील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम झाला. अनेक रुग्णालयात रुग्णांचे अतोनात हाल झाले. अखेरीस सरकारने कारवाईचा बडगा उगारत थेट मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला. एव्हान सरकार इथेच थांबले नाही तर संप मागे घ्या अन्यथा हॉस्टेल खाली करा असा इशारा दिला. सरकारच्या दबाबमुळे संपकरी डॉक्टर गोत्यात सापडले. संपाच्या तिसर्‍या दिवशी पुण्यातील डॉक्टरांना संपातून बाहेर पडल्याने फूट पडली. त्यांच्यापाठोपाठ मार्डचे अध्यक्ष डॉ.संतोष वाकचौरे यांनी संप मागे घेण्यास तयार आहोत अशी घोषणा आयबीएन लोकमतच्या माध्यमातून केली. आज दूपारी मात्र संपात उभी फूट पडली. राज्यभरातील 2,800 डॉक्टरांनी संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. फक्त मुंबईत हा संप सुरूच होता. अखेरीस तोही आता मागे घेण्यात आला आहे. एकंदरीतच चार मागण्यासाठी चार दिवस चाललेला संप सरकारच्या दबावतंत्रापुढे बळी पडला असंच यावरून स्पष्ट झालं. मात्र दुसरीकडे तब्बल 82 दिवसांपासून प्राध्यापक संपावर आहे अजूनही त्याबद्दल तोडगा निघालेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2013 02:05 PM IST

अखेर निवासी डॉक्टरांचा संप मागे

26 एप्रिल

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून संपावर गेलेल्या मार्डच्या डॉक्टरांनी अखेर संप मागे घेतला आहे. आमच्या मागण्या 100 टक्के पूर्ण झालेल्या नाहीत. मात्र दुष्काळ संपल्यानंतर मागण्या पूर्ण करण्याचं वैद्यकीत मंत्री विजयकुमार गावित यांनी आश्वासन दिल्यामुळे संप मागे घेत असल्याचं मार्डचे अध्यक्ष डॉ.संतोष वाकचौरे यांनी जाहीर केलं. तर दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत संपात मोठी फूट पडली. गुरूवारी पुण्यातील डॉक्टरांनी संपातून बाहेर पडले तर आज राज्यभरातील 2,800 डॉक्टरांनीही संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपातली हवा निघून गेली.

विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं बेमुदत संप पुकारला होता. 6 हजारांचा भत्ता वाढवून 15 हजार करण्यात यावा आणि हा भत्ता 2009 पासून द्यावा, निवासी डॉक्टरांची सुरक्षा वाढवावी, मेडिकलच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना दरवर्षी 10 टक्के फी वाढ आणि केंद्र सरकारची सेंट्रल रेसिडेंसी योजना निवासी डॉक्टरांना लागू करावी अशा मागण्यासाठी हा संप पुकरण्यात आला होता. या पैकी काही मागण्या मान्य केल्या. यात सरकारने 5 हजारांचा भत्ता वाढवून देण्याचा निर्णय घेतला. तर सुरक्षेसाठी उपयोजना केल्या जातील असं आश्वासन दिलं होतं. इतर मागण्या अमान्य करण्यात आल्या. मात्र मार्डने सरकाराचा निर्णय अमान्य केला. आणि संप सुरूच ठेवला. या संपामुळे राज्यतील वैद्यकीय सेवेवर मोठा परिणाम झाला. अनेक रुग्णालयात रुग्णांचे अतोनात हाल झाले.

अखेरीस सरकारने कारवाईचा बडगा उगारत थेट मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला. एव्हान सरकार इथेच थांबले नाही तर संप मागे घ्या अन्यथा हॉस्टेल खाली करा असा इशारा दिला. सरकारच्या दबाबमुळे संपकरी डॉक्टर गोत्यात सापडले. संपाच्या तिसर्‍या दिवशी पुण्यातील डॉक्टरांना संपातून बाहेर पडल्याने फूट पडली. त्यांच्यापाठोपाठ मार्डचे अध्यक्ष डॉ.संतोष वाकचौरे यांनी संप मागे घेण्यास तयार आहोत अशी घोषणा आयबीएन लोकमतच्या माध्यमातून केली. आज दूपारी मात्र संपात उभी फूट पडली. राज्यभरातील 2,800 डॉक्टरांनी संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. फक्त मुंबईत हा संप सुरूच होता. अखेरीस तोही आता मागे घेण्यात आला आहे. एकंदरीतच चार मागण्यासाठी चार दिवस चाललेला संप सरकारच्या दबावतंत्रापुढे बळी पडला असंच यावरून स्पष्ट झालं. मात्र दुसरीकडे तब्बल 82 दिवसांपासून प्राध्यापक संपावर आहे अजूनही त्याबद्दल तोडगा निघालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 26, 2013 12:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close