S M L

ठग सुदीप्तो नागपूर पोलिसांच्याही हिटलिस्टवर

27 एप्रिलपश्चिम बंगालमधला श्रद्धा चिट फंड घोटाळा सध्या बराच गाजतोय. या प्रकरणी सुदीप्तो सेन या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे नागपुरचे पोलीस गेल्या 11 वर्षांपासून या सुदीप्तो सेनच्या मागावर आहेत. या सुदीप्तोनं 11 वर्षांपूर्वी नागपुरात संचयनी सेव्हिंग्ज अँड इनव्हेंस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही गुंतवणूक कंपनी काढून महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांचे 6,00 कोटी रुपये बुडवले आहे. गुंतवणूकदारांच्या पैशातून सुदीप्तोनं नागपुरातल्या खामला, त्रिमूर्तीनगर, छत्रपती चौक आणि वर्धा रोड या भागात मालमत्ता खरेदी केली. 2001 मध्ये ही कंपनी बुडू लागली तेव्ही गुंतवणूकदार पैसे परत मागण्यासाठी दबाव टाकू लागले. तेव्हा सुदीप्तोने ऑफिसला टाळं ठोकून पळ काढला. याप्रकरणी सुदीप्तो सेन, सुनील कुमार गांगुली, गौरी भामिक आणि विभागीय व्यवस्थापक विद्याधर पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काय आहे हा घोटाळा ?- ठग सुदिप्तो सेन याने 1987 मध्ये कोलकाता येथील लेनिन सारणी येथे संचयनी सेव्हिंग्ज आणि इनव्हेस्टमेंट प्रा. लि नावाने कंपनी सुरु केली - हळूहळू संचयनीचा विस्तार महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये झाला - नागपुरसह अनेक शहरात शाखा उघडण्यात आल्या - पोस्ट खाताच्या योजनेच्या धर्तीवर नागरिकांना संचयनीत गुंतवणूक करण्यात आकर्षीत करण्यात आले. - गुंतवणूक केलेली रक्कम अल्पावधीत दीड ते दोन पटीने करण्याचे आमिष दाखवण्यात आले - या आमिषाला बळी पडून नागपुरातल्या 15 हजारावर लोकांनी संचयनीत गुंतवणूक केली- बहुतंाश गुंतवणूकदार हे छोटेमोठे दुकानदार, व्यापारी आणि मध्यमवर्गीय होते

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:29 PM IST

ठग सुदीप्तो नागपूर पोलिसांच्याही हिटलिस्टवर

27 एप्रिल

पश्चिम बंगालमधला श्रद्धा चिट फंड घोटाळा सध्या बराच गाजतोय. या प्रकरणी सुदीप्तो सेन या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पण, धक्कादायक बाब म्हणजे नागपुरचे पोलीस गेल्या 11 वर्षांपासून या सुदीप्तो सेनच्या मागावर आहेत. या सुदीप्तोनं 11 वर्षांपूर्वी नागपुरात संचयनी सेव्हिंग्ज अँड इनव्हेंस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही गुंतवणूक कंपनी काढून महाराष्ट्रातल्या गुंतवणूकदारांचे 6,00 कोटी रुपये बुडवले आहे. गुंतवणूकदारांच्या पैशातून सुदीप्तोनं नागपुरातल्या खामला, त्रिमूर्तीनगर, छत्रपती चौक आणि वर्धा रोड या भागात मालमत्ता खरेदी केली. 2001 मध्ये ही कंपनी बुडू लागली तेव्ही गुंतवणूकदार पैसे परत मागण्यासाठी दबाव टाकू लागले. तेव्हा सुदीप्तोने ऑफिसला टाळं ठोकून पळ काढला. याप्रकरणी सुदीप्तो सेन, सुनील कुमार गांगुली, गौरी भामिक आणि विभागीय व्यवस्थापक विद्याधर पांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे हा घोटाळा ?

- ठग सुदिप्तो सेन याने 1987 मध्ये कोलकाता येथील लेनिन सारणी येथे संचयनी सेव्हिंग्ज आणि इनव्हेस्टमेंट प्रा. लि नावाने कंपनी सुरु केली - हळूहळू संचयनीचा विस्तार महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये झाला - नागपुरसह अनेक शहरात शाखा उघडण्यात आल्या - पोस्ट खाताच्या योजनेच्या धर्तीवर नागरिकांना संचयनीत गुंतवणूक करण्यात आकर्षीत करण्यात आले. - गुंतवणूक केलेली रक्कम अल्पावधीत दीड ते दोन पटीने करण्याचे आमिष दाखवण्यात आले - या आमिषाला बळी पडून नागपुरातल्या 15 हजारावर लोकांनी संचयनीत गुंतवणूक केली- बहुतंाश गुंतवणूकदार हे छोटेमोठे दुकानदार, व्यापारी आणि मध्यमवर्गीय होते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2013 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close