S M L

अवकाळी पावसामुळे बळीराजाची मेहनत 'पाण्यात'

27 एप्रिलहिंगोली : दुष्काळाने होरपळणार शेतकर्‍यांनी मोठा मेहनतीने फळबाग उभ्या केल्या मात्र असमानी संकटामुळे बळीराजाची मेहनत पाण्यात गेलीय. हिंगोलीत शुक्रवारी झालेल्या गारपिटीनं केळी,आंबे पपईसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अगोदरच दुष्काळाच्या आगीत मराठवाडा आणि मराठवाड्यातील शेतकरी होरपळत आहे, त्यात निसर्ग हा जणू शेतकर्‍यांची परीक्षाच घेतोय. मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असताना जी थोडी फार पिकं उरली आहेत तीही कालच्या गारपिटीनं उध्वस्त झाली आहेत. यामुळे या भागातील जवळपास 200 हेक्टर भागावरच्या पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:28 PM IST

अवकाळी पावसामुळे बळीराजाची मेहनत 'पाण्यात'

27 एप्रिल

हिंगोली : दुष्काळाने होरपळणार शेतकर्‍यांनी मोठा मेहनतीने फळबाग उभ्या केल्या मात्र असमानी संकटामुळे बळीराजाची मेहनत पाण्यात गेलीय. हिंगोलीत शुक्रवारी झालेल्या गारपिटीनं केळी,आंबे पपईसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अगोदरच दुष्काळाच्या आगीत मराठवाडा आणि मराठवाड्यातील शेतकरी होरपळत आहे, त्यात निसर्ग हा जणू शेतकर्‍यांची परीक्षाच घेतोय. मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असताना जी थोडी फार पिकं उरली आहेत तीही कालच्या गारपिटीनं उध्वस्त झाली आहेत. यामुळे या भागातील जवळपास 200 हेक्टर भागावरच्या पिकाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2013 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close