S M L

टोल विरोधात कोल्हापुरात कडकडीत बंद

01 मेकोल्हापूर : आज महाराष्ट्र दिन आहे.. पण आजच कोल्हापूरमध्ये टोलविरोधात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला. या बंदला व्यापार्‍यांनी आणि नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शहरातील वाहतूक जरी काही प्रमाणात सुरु असली तरी दुकान आणि हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात टोल वसुली सुरु होणार होती. मात्र, टोल विरोधी कृती समितीच्या इशार्‍यानंतर नगरविकास खात्याने या वसुलीला स्थगिती दिली होती. आता एक वर्षानंतर राज्य सरकार कोल्हापूरच्या टोल वसुलीवरची ही स्थगिती उठवणार, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर कोल्हापूरकरांनी त्याला जोरदार विरोध केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:19 PM IST

टोल विरोधात कोल्हापुरात कडकडीत बंद

01 मे

कोल्हापूर : आज महाराष्ट्र दिन आहे.. पण आजच कोल्हापूरमध्ये टोलविरोधात सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला. या बंदला व्यापार्‍यांनी आणि नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शहरातील वाहतूक जरी काही प्रमाणात सुरु असली तरी दुकान आणि हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत. आज चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात टोल वसुली सुरु होणार होती. मात्र, टोल विरोधी कृती समितीच्या इशार्‍यानंतर नगरविकास खात्याने या वसुलीला स्थगिती दिली होती. आता एक वर्षानंतर राज्य सरकार कोल्हापूरच्या टोल वसुलीवरची ही स्थगिती उठवणार, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर कोल्हापूरकरांनी त्याला जोरदार विरोध केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2013 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close