S M L

दुष्काळग्रस्तांना स्वस्त धान्य प्रस्ताव विचारधीन -शरद पवार

01 मेपुणे : राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे आणि केंद्र सरकारचा राज्य सरकारला भक्कम पाठिंबा असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुण्यात सांगितलं. दुष्काळी भागातील जनतेला पुरेसं अन्नधान्य मिळावं, यासाठी APL-BPL अशी विभागणी करण्याऐवजी सर्वांना बीपीएलधारक म्हणून रेशन धान्य पुरवण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. सध्या उन्हाचे चटके बसतायत. तापमान 41 डिग्री आहे, पण 'कडक उन्हाळा म्हणजे चांगला पाऊस' असं समीकरण मानलं जातं. म्हणून मी खूष आहे असंही पवार म्हणालेत. यंदा 98 ते 102 टक्के पाऊस पडेल असा हवामान खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. चांगल्या पावसाने परिस्थिती बदलेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. दिल्लीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातील कायम दुष्काळी भागातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प लवकर कसे पूर्ण करता येतील त्याच्या नियोजनाकरता 30 एप्रिलला बैठक बोलवली होती पण महाराष्ट्र दिनामुळे दिल्लीत जाता येणं शक्य नसल्यानं ही बैठक पुढं ढकलण्यात आली असं स्पष्टीकरणही पवार यांनी दिलंय.CBI ला स्वायत्ता देवून समन्वय कसा साधणार ?सी.बी.आय प्रमुखांनीच स्वत: सांगितलंय की, सीबीआय ही सरकारी विंग आहे. कायदा मंत्र्यांना,गृहमंत्र्यांनी विचारल्यानंतर रिपोर्ट दाखवणं ही माझी जबाबदारीच आहे. इनव्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये बदल केलेल नाहीत. बदल केले असते तर ते आक्षेपार्ह होतं अशा शब्दात शरद पवार यांनी कोळसा घोटाळ्यावरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारल्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच सरकार आणि सरकारमधलेच मंत्रीच जर कोणत्या घटनेची सी.बी. आय चौकशी करायची हे ठरवणार असतील तर सीबीआयला स्वायत्ता करून समन्वय कसा साधणार असा प्रति सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.22,500 मेट्रिक टन पशुखाद्य चारा छावण्यांना दिला जाणारमहाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील जनावरांना गुजरातमधील मेहसाणा जिल्हा दूध संघ, अमूल डेअरी, साबर डेअरी यांच्यातर्फे 22,500 मेट्रीक टन म्हणजे सव्वा दोन लाख किलो पशुखाद्याचं वाटप आगामी दोन महिन्यात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदनं पुढाकार घेत पशुखाद्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. अजित पवारांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून राज्यातील दुष्काळी भागातील जनावरांच्या छावण्याकडे पशुखाद्य रवाना होणार आहे अशी माहितीही पवारांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:18 PM IST

दुष्काळग्रस्तांना स्वस्त धान्य प्रस्ताव विचारधीन -शरद पवार

01 मे

पुणे : राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे आणि केंद्र सरकारचा राज्य सरकारला भक्कम पाठिंबा असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पुण्यात सांगितलं. दुष्काळी भागातील जनतेला पुरेसं अन्नधान्य मिळावं, यासाठी APL-BPL अशी विभागणी करण्याऐवजी सर्वांना बीपीएलधारक म्हणून रेशन धान्य पुरवण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.

सध्या उन्हाचे चटके बसतायत. तापमान 41 डिग्री आहे, पण 'कडक उन्हाळा म्हणजे चांगला पाऊस' असं समीकरण मानलं जातं. म्हणून मी खूष आहे असंही पवार म्हणालेत. यंदा 98 ते 102 टक्के पाऊस पडेल असा हवामान खात्याचा प्राथमिक अंदाज आहे. चांगल्या पावसाने परिस्थिती बदलेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. दिल्लीत पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातील कायम दुष्काळी भागातील अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प लवकर कसे पूर्ण करता येतील त्याच्या नियोजनाकरता 30 एप्रिलला बैठक बोलवली होती पण महाराष्ट्र दिनामुळे दिल्लीत जाता येणं शक्य नसल्यानं ही बैठक पुढं ढकलण्यात आली असं स्पष्टीकरणही पवार यांनी दिलंय.

CBI ला स्वायत्ता देवून समन्वय कसा साधणार ?

सी.बी.आय प्रमुखांनीच स्वत: सांगितलंय की, सीबीआय ही सरकारी विंग आहे. कायदा मंत्र्यांना,गृहमंत्र्यांनी विचारल्यानंतर रिपोर्ट दाखवणं ही माझी जबाबदारीच आहे. इनव्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये बदल केलेल नाहीत. बदल केले असते तर ते आक्षेपार्ह होतं अशा शब्दात शरद पवार यांनी कोळसा घोटाळ्यावरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारल्याच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तसंच सरकार आणि सरकारमधलेच मंत्रीच जर कोणत्या घटनेची सी.बी. आय चौकशी करायची हे ठरवणार असतील तर सीबीआयला स्वायत्ता करून समन्वय कसा साधणार असा प्रति सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.

22,500 मेट्रिक टन पशुखाद्य चारा छावण्यांना दिला जाणार

महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील जनावरांना गुजरातमधील मेहसाणा जिल्हा दूध संघ, अमूल डेअरी, साबर डेअरी यांच्यातर्फे 22,500 मेट्रीक टन म्हणजे सव्वा दोन लाख किलो पशुखाद्याचं वाटप आगामी दोन महिन्यात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ अर्थात महानंदनं पुढाकार घेत पशुखाद्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. अजित पवारांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून राज्यातील दुष्काळी भागातील जनावरांच्या छावण्याकडे पशुखाद्य रवाना होणार आहे अशी माहितीही पवारांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2013 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close