S M L

लाचखोर अधिकार्‍यांचा 'हॉस्पिटल ड्रामा', अटक लांबणीवर

02 मेनाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाचखोर अधिकारी सतीश चिखलीकरला तिसरा दिवस उजाडला तरी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या मालमत्तेची मोजणी अद्याप सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामाचं बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडून 22 हजार रुपयांची लाच मागितली होती. कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या वतीनं शाखा अभियंता जगदिश वाघ यांना ही लाच स्वीकारताना ऍण्टी करप्शननं त्यांना पकडलं होतं. त्यांच्या घरांवर घातलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 2 कोटी 96 लाख रूपयांची मालमत्ता सापडली होती. विशेष म्हणजे, पायी चालण्याएवढे ते निरोगी दिसत असताना, त्यांना अत्यावस्थ म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची अटक लांबली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:11 PM IST

लाचखोर अधिकार्‍यांचा 'हॉस्पिटल ड्रामा', अटक लांबणीवर

02 मे

नाशिक : सार्वजनिक बांधकाम खात्याचे लाचखोर अधिकारी सतीश चिखलीकरला तिसरा दिवस उजाडला तरी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यांच्या मालमत्तेची मोजणी अद्याप सुरू आहे. रस्त्याच्या बांधकामाचं बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडून 22 हजार रुपयांची लाच मागितली होती. कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर यांच्या वतीनं शाखा अभियंता जगदिश वाघ यांना ही लाच स्वीकारताना ऍण्टी करप्शननं त्यांना पकडलं होतं. त्यांच्या घरांवर घातलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 2 कोटी 96 लाख रूपयांची मालमत्ता सापडली होती. विशेष म्हणजे, पायी चालण्याएवढे ते निरोगी दिसत असताना, त्यांना अत्यावस्थ म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांची अटक लांबली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2013 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close