S M L

साई संस्थानची विश्वस्त समिती पुन्हा बरखास्त

02 मेऔरंगाबाद : शिर्डीतल्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्थांना हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा एक झटका दिला. राजकीय वर्चस्व आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी यामुळे शिर्डी संस्थानची ही विश्वस्त समिती न्यायालयाने बरखास्त केली. गेल्या वर्षी 27 मार्चला या समितीची नियुक्ती करण्यात आली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर मुख्यमंत्र्यांनीच ही समिती नियुक्त केली होती. पण, या समितीमध्ये राजकीय नेत्यांचा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांचा भरणा असल्याचा ठपका कोर्टाने ठेवला. याआधीचं विश्वस्त मंडळही गैरव्यवहाराच्या आरोपानंतर बरखास्त करण्यात आलं होतं. याबाबतची जनहित याचिका साईभक्त संजय काळे यांनी दाखल केली होती. त्याची सुनावणी आज औरंगाबाद खंडपीठात झाली. कोर्टाने विद्यमान समिती बरखास्त करून दोन आठवड्यात नवीन समिती नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:06 PM IST

साई संस्थानची विश्वस्त समिती पुन्हा बरखास्त

02 मे

औरंगाबाद : शिर्डीतल्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्थांना हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा एक झटका दिला. राजकीय वर्चस्व आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी यामुळे शिर्डी संस्थानची ही विश्वस्त समिती न्यायालयाने बरखास्त केली. गेल्या वर्षी 27 मार्चला या समितीची नियुक्ती करण्यात आली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर मुख्यमंत्र्यांनीच ही समिती नियुक्त केली होती.

पण, या समितीमध्ये राजकीय नेत्यांचा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍यांचा भरणा असल्याचा ठपका कोर्टाने ठेवला. याआधीचं विश्वस्त मंडळही गैरव्यवहाराच्या आरोपानंतर बरखास्त करण्यात आलं होतं. याबाबतची जनहित याचिका साईभक्त संजय काळे यांनी दाखल केली होती. त्याची सुनावणी आज औरंगाबाद खंडपीठात झाली. कोर्टाने विद्यमान समिती बरखास्त करून दोन आठवड्यात नवीन समिती नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 2, 2013 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close