S M L

लाचखोर चिखलीकर आणि भुजबळांचे लागेबांधे -सोमय्या

04 मेनाशिकमध्ये लाचखोर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केलीय. लाचखोर अधिकारी चिखलीकर यांच्याशी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे हितसंबंध असल्याचा थेट आरोप सोमय्या यांनी केला. तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी शिवसेना आणि भाजपने केली आहे. या प्रकरणी भाजपने बांधकाम भवनासमोर निदर्शनं केली, तर शिवसेनेनं जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिलं. सतीश चिखलीकर या कार्यकारी अभियंत्यांकडे तब्बल 14 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता सापडली. तर, शाखा अभियंता जगदीश वाघ यांच्याकडेही 86 लाखांचा ऐवज सापडलाय. रस्त्याचं बील मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडून 6 टक्के दराप्रमाणे 22 हजारांची मागणी केली होती. ऍण्टी करप्शनच्या ब्युरोच्या या कारवाईतून सार्वजनिक बांधकाम खात्यातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:01 PM IST

लाचखोर चिखलीकर आणि भुजबळांचे लागेबांधे -सोमय्या

04 मे

नाशिकमध्ये लाचखोर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केलीय. लाचखोर अधिकारी चिखलीकर यांच्याशी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे हितसंबंध असल्याचा थेट आरोप सोमय्या यांनी केला.

तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी शिवसेना आणि भाजपने केली आहे. या प्रकरणी भाजपने बांधकाम भवनासमोर निदर्शनं केली, तर शिवसेनेनं जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिलं. सतीश चिखलीकर या कार्यकारी अभियंत्यांकडे तब्बल 14 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता सापडली.

तर, शाखा अभियंता जगदीश वाघ यांच्याकडेही 86 लाखांचा ऐवज सापडलाय. रस्त्याचं बील मंजूर करण्यासाठी त्यांनी ठेकेदाराकडून 6 टक्के दराप्रमाणे 22 हजारांची मागणी केली होती. ऍण्टी करप्शनच्या ब्युरोच्या या कारवाईतून सार्वजनिक बांधकाम खात्यातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2013 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close