S M L

बस स्थानकावर 10 दिवसांची चिमुरडी सापडली

04 मेऔरंगाबाद : येथील मुख्य एसटी बस स्थानकावर आज भल्या पहाटे 10 दिवसांचं स्त्री नवजात बाळ सापडलं. बस स्थानकावरील कचरा कुंडीत हे बाळ कुणीतरी टाकू न दिलं होतं. पहाटे कचरा उचलणार्‍या कर्मचार्‍याला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्याने कचरा बाजुला करुन कापडात गुंडाळलेलं हे बाळ बाहेर काढलं. कर्मचार्‍याने सदरची घटना क्रांती चौक पोलिसांना कळविली. मात्र पोलीस तब्बल दोन तासांनी पोहचल्याने या बाळाची काळजी या सफाई कर्मचार्‍यानेचं घेतल्याचं कळलंय. सध्या या बाळावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 01:00 PM IST

बस स्थानकावर 10 दिवसांची चिमुरडी सापडली

04 मे

औरंगाबाद : येथील मुख्य एसटी बस स्थानकावर आज भल्या पहाटे 10 दिवसांचं स्त्री नवजात बाळ सापडलं. बस स्थानकावरील कचरा कुंडीत हे बाळ कुणीतरी टाकू न दिलं होतं. पहाटे कचरा उचलणार्‍या कर्मचार्‍याला बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने त्याने कचरा बाजुला करुन कापडात गुंडाळलेलं हे बाळ बाहेर काढलं. कर्मचार्‍याने सदरची घटना क्रांती चौक पोलिसांना कळविली. मात्र पोलीस तब्बल दोन तासांनी पोहचल्याने या बाळाची काळजी या सफाई कर्मचार्‍यानेचं घेतल्याचं कळलंय. सध्या या बाळावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 4, 2013 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close