S M L

नितीन गडकरींच्या 'पूर्ती'ने चुकवला 7 कोटींचा कर

06 मेनागपूर : भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहाने सात कोटी रुपयांचा कर चुकवल्याचं प्राप्तीकर खात्याने केलेल्या चौकशीत निष्पन्न झालं आहेत. प्राप्तीकर विभागाने पूर्ती पॉवर्स ऍंन्ड शुगर या कंपनीच्या दोन वर्षातील विवरणाची तपासणी केली त्यात ही बाब उघड झाली. तर दुसरीकडे याबाबात आम्हाला कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचं पूर्ती समूहाचे जनसंपर्क अधिकारी नितीन कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. एखादी नोटीस मिळाली म्हणजे गैरप्रकार झाल्याच सिद्ध होतं नाही. गडकरी हे गेल्या दोन वषांर्पासून पूर्ती उद्योगाशी संबंधित नाही असंही कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. मात्र पूर्ती च्या अंतर्गत कंपन्यांच्या अवैध कामामुळे नितीन गडकरींनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 12:27 PM IST

नितीन गडकरींच्या 'पूर्ती'ने चुकवला 7 कोटींचा कर

06 मे

नागपूर : भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहाने सात कोटी रुपयांचा कर चुकवल्याचं प्राप्तीकर खात्याने केलेल्या चौकशीत निष्पन्न झालं आहेत. प्राप्तीकर विभागाने पूर्ती पॉवर्स ऍंन्ड शुगर या कंपनीच्या दोन वर्षातील विवरणाची तपासणी केली त्यात ही बाब उघड झाली.

तर दुसरीकडे याबाबात आम्हाला कुठलीही नोटीस मिळाली नसल्याचं पूर्ती समूहाचे जनसंपर्क अधिकारी नितीन कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. एखादी नोटीस मिळाली म्हणजे गैरप्रकार झाल्याच सिद्ध होतं नाही. गडकरी हे गेल्या दोन वषांर्पासून पूर्ती उद्योगाशी संबंधित नाही असंही कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. मात्र पूर्ती च्या अंतर्गत कंपन्यांच्या अवैध कामामुळे नितीन गडकरींनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2013 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close