S M L

बारामती लख्ख प्रकाशात, महाराष्ट्र मात्र अजूनही अंधारात !

06 मेमहाराष्ट्र 2012 पर्यंत लोडशेडिंग मुक्त करू, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती आणि आता राज्यात लोडशेडिंग नाही असा दावा सध्या केला जातोय. पण आजही राज्यातल्या ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरूच आहे. तब्बल 6 ते 7 तासाचं लोडशेडिंग आजसुद्धा सुरू आहे. वीज निर्मिती आणि गरज यात आजही तफावत आहे. तसंच वीज चोरी आणि वीज गळतीचं प्रमाणही मोठं आहे. विशेष म्हणजे पवारांच्या बारामतीत लोडशेडिंग नाही पण राज्य अंधारात आहे अशीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. यातही महत्त्वाचं म्हणजे लोडशेडिंगमध्येही पश्चिम महाराष्ट्रला झुकत माप देत उर्वरीत महाराष्ट्र अंधारात ढकला आहे. पाहूयात राज्यभरातलं वास्तव काय आहे ते...लोडशेडिंग सुरूच पुणे जिल्हा - बारामती - गावात लोडशेडिंग नाही- ग्रामीण भाग- 6 तास- इंदापूर : शेतीसाठी 16 तास - वस्तीसाठी- 8 तास - पुरंदर- दोन भागांत 12 ते 13 तास- जुन्नर : ग्रामीण भागात शेतीसाठी 5 ते 6 तास कोल्हापूर - कोल्हापूर शहर आणि जिल्हा- लोडशेडिंग मुक्त - इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल- लोडशेडिंग नाही- शहरात गेले 6 महिने शून्य टक्के लोडशेडिंग- कोल्हापूरच्या सर्व 12 तालुक्यांमध्ये लोडशेडिंग नाही- शेतीपंपासाठी 6 ते 8 तास लोडशेडिंगसांगली - सांगली शहरात शुन्य टक्के लोडशेडिंग- इस्लामपूर, मिरज शहरासह 10 तालुक्यामंध्ये लोडशेडिंग नाही- जत, आटपाडी, कवठेमहाकांळ -6 ते 7 तास- सांगली, मिरज, कुपवाड -लोडशेडिंग नाहीउत्तर महाराष्ट्र - धुळे ग्रामीण - 12 तास- धुळे शहर - 6 तास- अहमदनगर ग्रामीण - 12 तास- अहमदनगर शहर - 6 तास- नंदूरबार शहर - 8 तास- नंदूरबार ग्रामीण - 12 तास- मनमाड शहर - 8 तास - नाशिक - शहर - 0 तास- नाशिक - ग्रामीण - 6 तासनागपूर शहर महसूल मुख्यालय असल्यानं MCDCL च्या वतीने नागपूर शहर लोडशेडिंगमुक्त असल्याचा दावा केला जातोय. कामाठी, कन्हान आणि बाजारगाव या ठिकाणी मात्र दिवसाला 6 तास लोडशेडिंग होतंय. या भागात वीजचोरी होत असल्यामुळे इथं लोडशेडिंग केलं जात असल्याचा दावा केला जातोय.अनेक ठिकाणी ग्रामीण भागात सिंगल फेजद्वारे वीजपुरवठा केला जातो. शेतीपंपासाठी दिवसा 8 तास तर रात्री 10 तास वीजपुरवठा केला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 12:25 PM IST

बारामती लख्ख प्रकाशात, महाराष्ट्र मात्र अजूनही अंधारात !

06 मे

महाराष्ट्र 2012 पर्यंत लोडशेडिंग मुक्त करू, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती आणि आता राज्यात लोडशेडिंग नाही असा दावा सध्या केला जातोय. पण आजही राज्यातल्या ग्रामीण भागात लोडशेडिंग सुरूच आहे. तब्बल 6 ते 7 तासाचं लोडशेडिंग आजसुद्धा सुरू आहे.

वीज निर्मिती आणि गरज यात आजही तफावत आहे. तसंच वीज चोरी आणि वीज गळतीचं प्रमाणही मोठं आहे. विशेष म्हणजे पवारांच्या बारामतीत लोडशेडिंग नाही पण राज्य अंधारात आहे अशीच परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. यातही महत्त्वाचं म्हणजे लोडशेडिंगमध्येही पश्चिम महाराष्ट्रला झुकत माप देत उर्वरीत महाराष्ट्र अंधारात ढकला आहे. पाहूयात राज्यभरातलं वास्तव काय आहे ते...

लोडशेडिंग सुरूच पुणे जिल्हा

- बारामती - गावात लोडशेडिंग नाही- ग्रामीण भाग- 6 तास- इंदापूर : शेतीसाठी 16 तास - वस्तीसाठी- 8 तास - पुरंदर- दोन भागांत 12 ते 13 तास- जुन्नर : ग्रामीण भागात शेतीसाठी 5 ते 6 तास

कोल्हापूर

- कोल्हापूर शहर आणि जिल्हा- लोडशेडिंग मुक्त - इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल- लोडशेडिंग नाही- शहरात गेले 6 महिने शून्य टक्के लोडशेडिंग- कोल्हापूरच्या सर्व 12 तालुक्यांमध्ये लोडशेडिंग नाही- शेतीपंपासाठी 6 ते 8 तास लोडशेडिंग

सांगली

- सांगली शहरात शुन्य टक्के लोडशेडिंग- इस्लामपूर, मिरज शहरासह 10 तालुक्यामंध्ये लोडशेडिंग नाही- जत, आटपाडी, कवठेमहाकांळ -6 ते 7 तास- सांगली, मिरज, कुपवाड -लोडशेडिंग नाहीउत्तर महाराष्ट्र - धुळे ग्रामीण - 12 तास- धुळे शहर - 6 तास- अहमदनगर ग्रामीण - 12 तास- अहमदनगर शहर - 6 तास- नंदूरबार शहर - 8 तास- नंदूरबार ग्रामीण - 12 तास- मनमाड शहर - 8 तास - नाशिक - शहर - 0 तास- नाशिक - ग्रामीण - 6 तासनागपूर शहर महसूल मुख्यालय असल्यानं MCDCL च्या वतीने नागपूर शहर लोडशेडिंगमुक्त असल्याचा दावा केला जातोय. कामाठी, कन्हान आणि बाजारगाव या ठिकाणी मात्र दिवसाला 6 तास लोडशेडिंग होतंय. या भागात वीजचोरी होत असल्यामुळे इथं लोडशेडिंग केलं जात असल्याचा दावा केला जातोय.अनेक ठिकाणी ग्रामीण भागात सिंगल फेजद्वारे वीजपुरवठा केला जातो. शेतीपंपासाठी दिवसा 8 तास तर रात्री 10 तास वीजपुरवठा केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2013 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close