S M L

एलबीटी विरोधात 'शटर डाऊनच'

09 मेमुंबई : एलबीटीच्या विरोधात राज्यभरात व्यापार्‍यांचा बंद सुरूच आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह, नागपूरपासून ते अगदी चंद्रपूरपर्यंत व्यापार्‍यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. ऐन लग्नसराई आणि सुट्‌ट्या सुरू आहेत. अशात दुकानं बंद असल्यानं ग्राहकांची गैरसोय होतेय. सरकारने एलबीटीचा निर्णय रद्द करून पुन्हा जकात सुरू करावा अशी मागणी व्यापारी करत आहेत. पण एलबीटीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. याच विषयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. नागपुरात बंदला हिंसक वळणगेल्या पंधरा दिवसापासून नागपुरात एलबीटीच्या विरोधात सुरू असलेल्या बंदाला बुधवारी रात्री हिंसक वळण लागलंय. रात्री एक वाजण्याच्या सुमाराला व्यापार्‍यांच्या एका गटानं शहरात धुमाकूळ घालत बसेसची तोडफोड केली. अनेक ठिकाणी टायरही जाळण्यात आलेत. रात्री व्यापार्‍यांनी शालीमार आणि महाराष्ट्र एक्सप्रेसही काही काळ अडवून धरली होती. याप्रकऱणी पोलिसांनी दोन व्यापार्‍यांना अटक करण्यात आली आहे.मुंबईत बंदमुंबईमध्ये अजून LBT अजूनही लागू झालेला नाही. पण त्याविरोधात व्यापार्‍यांनी आपली भूमिका ताठर केलीये. एलबीटीला विरोध करत व्यापार्‍यांनी बंद सुरू केलाय. गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठा बंद आहे. त्याचा फटका सामान्य जनतेला बसतोय. नाशिकमध्ये मोर्चानाशिकमध्ये देखील व्यापार्‍यांनी एलबीटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रविवार कारंजापासून सुरू झालेल्या या मोर्च्यात व्यापारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यांनी बाजारपेठेतली उघडी दुकानं बंद केली. तसंच रास्ता रोकोही केला. यात भाजपचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांमुळेच व्यापारी रस्त्यावर आल्याची टीका या व्यापार्‍यांनी केली.कोल्हापुरात उद्यापासून पुन्हा बंदकोल्हापूरमध्ये सर्वात आधी एलबीटी लागू करण्यात आला होता, तिथल्या व्यापार्‍यांनी आधीपासूनच एलबीटीला विरोध केलाय. कोल्हापुरातले व्यापारी उद्यापासून संपावर आहेत.एलबीटी म्हणजे काय ? - एलबीटी म्हणजे स्थानिक संस्था कर - जकातीऐवजी लागू होणार- टप्प्याटप्प्यानं राज्यातल्या महापालिका हद्दींमध्ये लागू होणार- लागू झाले आहे तेथे उत्पन्न वाढल्याचा शासनाचा दावा- महापालिकांचं उत्पन्न वाढेल- व्हॅट असताना नवीन कर का? व्यापारी संघटनांचा आरोप एलबीटी का? सरकारचा दावा- राज्य जकातमुक्त होईल- जकात चोरीला आळा बसेल- जकातीवरच्या यंत्रणेवर होणारा खर्च टळेल- सर्व व्यापारी वर्गाची नोंदणी होईल विरोध का?- इन्स्पेक्शन राज वाढेल- लहान व्यापार्‍यांचा जाच वाढेल- महापालिका कर्मचार्‍यांचा विरोध

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2013 12:19 PM IST

एलबीटी विरोधात 'शटर डाऊनच'

09 मे

मुंबई : एलबीटीच्या विरोधात राज्यभरात व्यापार्‍यांचा बंद सुरूच आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यासह, नागपूरपासून ते अगदी चंद्रपूरपर्यंत व्यापार्‍यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. ऐन लग्नसराई आणि सुट्‌ट्या सुरू आहेत. अशात दुकानं बंद असल्यानं ग्राहकांची गैरसोय होतेय. सरकारने एलबीटीचा निर्णय रद्द करून पुन्हा जकात सुरू करावा अशी मागणी व्यापारी करत आहेत. पण एलबीटीचा निर्णय मागे घेतला जाणार नाही असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. याच विषयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे.

नागपुरात बंदला हिंसक वळण

गेल्या पंधरा दिवसापासून नागपुरात एलबीटीच्या विरोधात सुरू असलेल्या बंदाला बुधवारी रात्री हिंसक वळण लागलंय. रात्री एक वाजण्याच्या सुमाराला व्यापार्‍यांच्या एका गटानं शहरात धुमाकूळ घालत बसेसची तोडफोड केली. अनेक ठिकाणी टायरही जाळण्यात आलेत. रात्री व्यापार्‍यांनी शालीमार आणि महाराष्ट्र एक्सप्रेसही काही काळ अडवून धरली होती. याप्रकऱणी पोलिसांनी दोन व्यापार्‍यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईत बंद

मुंबईमध्ये अजून LBT अजूनही लागू झालेला नाही. पण त्याविरोधात व्यापार्‍यांनी आपली भूमिका ताठर केलीये. एलबीटीला विरोध करत व्यापार्‍यांनी बंद सुरू केलाय. गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठा बंद आहे. त्याचा फटका सामान्य जनतेला बसतोय.

नाशिकमध्ये मोर्चानाशिकमध्ये देखील व्यापार्‍यांनी एलबीटीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. रविवार कारंजापासून सुरू झालेल्या या मोर्च्यात व्यापारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. त्यांनी बाजारपेठेतली उघडी दुकानं बंद केली. तसंच रास्ता रोकोही केला. यात भाजपचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांमुळेच व्यापारी रस्त्यावर आल्याची टीका या व्यापार्‍यांनी केली.

कोल्हापुरात उद्यापासून पुन्हा बंदकोल्हापूरमध्ये सर्वात आधी एलबीटी लागू करण्यात आला होता, तिथल्या व्यापार्‍यांनी आधीपासूनच एलबीटीला विरोध केलाय. कोल्हापुरातले व्यापारी उद्यापासून संपावर आहेत.

एलबीटी म्हणजे काय ?

- एलबीटी म्हणजे स्थानिक संस्था कर - जकातीऐवजी लागू होणार- टप्प्याटप्प्यानं राज्यातल्या महापालिका हद्दींमध्ये लागू होणार- लागू झाले आहे तेथे उत्पन्न वाढल्याचा शासनाचा दावा- महापालिकांचं उत्पन्न वाढेल- व्हॅट असताना नवीन कर का? व्यापारी संघटनांचा आरोप

एलबीटी का?

सरकारचा दावा- राज्य जकातमुक्त होईल- जकात चोरीला आळा बसेल- जकातीवरच्या यंत्रणेवर होणारा खर्च टळेल- सर्व व्यापारी वर्गाची नोंदणी होईल

विरोध का?- इन्स्पेक्शन राज वाढेल- लहान व्यापार्‍यांचा जाच वाढेल- महापालिका कर्मचार्‍यांचा विरोध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2013 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close