S M L
  • बाईकचा वेग वाढवला तर पोलिसांना लागेल फोन !

    Published On: May 14, 2013 11:38 AM IST | Updated On: May 15, 2013 12:16 PM IST

    यवतमाळ 14 मे : येथील पुसद तालुक्यातील रहिवाशी अजय विश्वकर्मा या अभियंत्याने बाईक वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी रामबाण इलाज तयार केला आहे. अजयने बाईकचा वेग आणि बाइक सध्या कुठे आहे हे दाखवणारी स्लिम-व्ही यंत्रणा विकसित केली आहे. विशेष म्हणजे जीपीएस नावाची यंत्रणा कारमध्ये असते त्याच प्रमाणे ही यंत्रणा बाईकमध्ये वापरता येणार आहे. पण अजयने जीपीएस यंत्रणेच्या पुढचं पाऊल टाकलं आहे. दोन मोबाईलच्या साहयाने निर्माण करण्यात आलेल्या स्लिम-व्हीमध्ये एकदा जर स्पीड सेट केला तर त्यावरच्या स्पीडवर गाडी चालवल्यास मोबाईलवर तात्काळ कॉल येतो. ही यंत्रणा तीन स्तरावर काम करते. सुरवातीला सुरक्षित वेगापलिकडे गेल्यास बाईकवर लावलेली यंत्रणा वाजू लागते. आणखी वेग वाढवल्यास बाईकस्वाराच्या नातेवाईकास मोबाईलवरून सुचित केले जाते. तर शहरात वाहतूक पोलिसांनी आखलेल्या वेगमर्यादेपेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती यातील सिस्टीमवरुन कळते. त्यामुळे पोलिसांना या गाडीचा नंबर आणि गाडीची वेग नोंदवता येतो. या स्लिम-व्ही यंत्रणेची किंमत दोन हजार रुपये ठेवण्यात आली आहे. अजय विश्वकर्मा यांनी या यंत्रणेसाठी पेटंटही फाईलिंग केले आहे. कुठल्याही सरकारी यंत्रणेची मदत न घेता आणि संशोधनाचे कुठलेही साधने उपलब्ध नसतांना अजय यांचा हा उपक्रम सध्या चर्चेत आला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close