S M L
  • थेंब थेंब पाण्यासाठी गावकर्‍यांचा लढा !

    Published On: May 14, 2013 12:49 PM IST | Updated On: May 15, 2013 12:16 PM IST

    विनोद तळेकर, महाडमहाड 14 मे : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत, अनेक मोठे प्रकल्प उभारले जात आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत पण असंही एक गाव आहे, जिथे पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावकरी झगडत आहेत. निसर्गाशी लढताहेत, वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. पण दुष्काळ काही केल्या संपत नाही..आणि सरकारी यंत्रणाही मदतीला नकार देतेय.महाडपासून फक्त तीस किमी अंतरावरच्या पिंपळकोंड गावातली एक दुपार....नामदेव जाधव आणि त्यांचे सहकारी गावच्या देवळात रणरणत्या दुपारी विचारविनिमय करताहेत. गावाच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ हटवण्यासाठी चर्चा केली जातेय. गावाशेजारच्या डोंगरावर बारमाही वाहणार्‍या झर्‍यांचं पाणी एका पाईपच्या साह्याने गावात आणलं. गावातल्या टाक्यांमध्ये साठलेलं पाणी गावातल्या प्रत्येक घराला मिळण्यासाठी प्रत्येकाने आळीपाळीने पाण्याची व्यवस्था पाहायची असं ठरलं. टाक्यांमध्ये पुरेसं पाणी साठलं की, गावातला एक जण गावातल्या देवळात येऊन एका विशिष्ट पद्धतीने घंटा वाजवतो...घंटेचा आवाज ऐकल्यावर गावातल्या महिला पाणी आणायला येतात..त्यामुळे सगळ्यांना थोडं थोडं का होईना पण पाणी मिळतं. इथला उन्हाळा म्हणजे गावकर्‍यांवरचं मोठं संकट असतं. उन्हाळ्यात पाणी मिळवण्यासाठी या गावच्या गावकर्‍यांनी अक्षरश: प्रयत्नांची शिकस्त केली. फक्त सरकारच्या थोड्याशा मदतीमुळे इथलं जगणं सुसह्य होईल. त्यासाठी गावकर्‍यांनी सरकार दरबारी अनेक खेटे घातले, पण काही उपयोग झाला नाही. सरकार आता तरी या गावाकडे लक्ष देणार का या चिंतेत गावकरी आला दिवस ढकलत आहेत.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close