S M L

राहुल गांधी दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर

औरंगाबाद 28 मे : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज एका दिवसाच्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर आले आहेत. फुलंब्रीत एका चारा छावणीला त्यांनी भेट दिली. आणि तिथल्या गुरांना त्यांनी चारादेखील खाऊ घातला. राहुल त्यांच्या दौर्‍यात निधोनामधल्या नरेगाच्या कामाची पाहणी करणार आहेत. तसंच बाबरामधल्या चारा छावणीलाही भेट दिली. राहुलसोबत राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसंच राज्याचे कृषीमंत्री बाळासाहेब थोरात हेही होते. राहुल गांधी याआधी 27 आणि 28 मे या दोन दिवशी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येणार होते. मात्र, छत्तीसगडमधल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर या दौर्‍याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 13, 2013 02:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 28, 2013 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close