S M L

राज्यात दोन ठिकाणी भीषण अपघात 17 ठार

Sachin Salve | Updated On: Jun 24, 2013 04:09 PM IST

राज्यात दोन ठिकाणी भीषण अपघात 17 ठार

24 जून : आज राज्यात दोन ठिकाणी मोठे अपघात झाले. मुंंबई गोवा महामार्गावर खेडमधल्या लवेल गावाजवळ क्वालिस आणि डंपर यांचा भीषण अपघात झालाय. या अपघातात क्वालिसमधल्या 11 जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 3 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये 5 पुरुष 3 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.

भरधाव जाणार्‍या डंपरने क्वालीसला दिलेली धडक एवढी जोराची होती की, क्वालिसमधील 11 जण जागीच ठार झाले. तर दुसरीकडे बीडमध्ये सोलापूर महामार्गावर अपघात झाला. या अपघातात 6 ठार तर 5 जण जखमी झालेत. मॅजिक जीप आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे. सर्व मृत जालन्याचे आहेत.जखमींना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2013 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close