S M L

दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत पावसाची हजेरी

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2013 09:41 PM IST

दुष्काळग्रस्त उस्मानाबादेत पावसाची हजेरी

25 जून : दोन वर्षांपासून दुष्काळाचा तीव्र सामना करणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यात अखेर रिमझिम पावसाला सुरुवात झालीयं. जिल्ह्यातील आठ तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पडणार्‍या पावसानं काही प्रमाणात बळीराजा सुखावलाय. मात्र समाधानकारक पाऊस नसल्यानं पेरणीची काम खोळंबली आहे.

वर्धा जिल्ह्यातही आठवडाभरानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालीयं. गेल्या बारा तासांपासून पडणार्‍या जोरदार पावसामुळे नदीनाले ओसांडून वाहू लागले आहे. जोरदार पावसामुळे गेल्या दहा वर्षात धरणांच्या पातळीत पहिल्यांदाच वाढ झालीय. शेतकरी या पावसाने सुखावलेत.

कपाशी पेरणी 95 टक्के तर सोयाबीनची पेरणी 90 टक्के पूर्ण झाली आहे. यावर्षी कपाशीच्या पेरणीत वाढही झालीयं. जिल्ह्यात सर्वाधिक 50 एमएम पावसाची नोंद देवळी येथे झाली आहे. तर अनेक ठिकाणी घरांची पडझड पण झाल्याचे वृत्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2013 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close