S M L

तुकोबांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान

Sachin Salve | Updated On: Jun 29, 2013 06:16 PM IST

तुकोबांच्या पालखीचं आज देहूतून प्रस्थान

wari44429 जून : सर्व वारकर्‍यांसाठी सर्वात आनंदाचे दिवस म्हणजे वारीचे. त्या वारी सोहळयाला खर्‍या अर्थानं आज सुरुवात होतेय. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज देहूतून दुपारी साडेतीन वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

राज्यातून शेकडो दिंडी देहुमध्ये दाखल झाल्या असून तुकोबा-ज्ञानोबांच्या गजरानं देहूचा आसमंत भरून गेलाय. पावसाचीही बरसात सुरू असल्यानं...वरूण राजाच्या या कृपेमुळे वारकर्‍यांचाही आनंद शिगेला पोहोचलाय. तुकोबांची पालखी निघाल्यानंतर पहिला मुक्काम आज इनामदार वाड्यात असून पालखी उद्या पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं उद्या आळंदीतून प्रस्थान आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2013 01:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close