S M L

नाशिकमध्ये LBT चा फुसका बार?

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2013 08:59 PM IST

Image img_238792_lbtpune34_240x180.jpg02 जुलै : जकातीऐवजी एलबीटी लागू होऊन 1 महिना झाला पण नाशिकमध्ये एलबीटीची वसुली अत्यल्प आल्याच स्पष्ट झालंय.यामुळे महापालिकेसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. महानगरपालिकेला महिन्याभरात फक्त 12 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यापूर्वी जकातीचं महिन्याचं उत्पन्न होतं 60 कोटी रुपये. एलबीटीतून कमी उत्पन्न झाल्यामुळे आता आस्थापनाचा खर्च राखीव निधीतून करावा लागणार आहे. व्यापार्‍यांच्या दबावामुळे राज्य सरकारने तडजोडी केल्या आणि त्यामुळे महापालिका संकटात सापडली अशी नाशिकच्या महापौरांनी तक्रार केली आहे.

एलबीटीतील महागात पडलेल्या अटी

  • वार्षिक उलाढाल 1 लाखांवरून 5 लाख करणे
  • तपासणीचे अधिकार महापालिकेकडून काढून घेणे
  • कर भरणीची मुदत 20 दिवसांवरून 50 दिवस करणे
  • रिटर्नचा कालावधी 6 महिन्यांवरून वर्षाचा करणे

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2013 08:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close