S M L

सिंधुदुर्गात राष्ट्रवादीला धक्का, नगराध्यक्षपदी पूजा कर्पे

Sachin Salve | Updated On: Jul 10, 2013 10:07 PM IST

सिंधुदुर्गात राष्ट्रवादीला धक्का, नगराध्यक्षपदी पूजा कर्पे

SINDHUDURG CONG NCP310 जुलै : सिंधुदुर्गात वेंगुर्ले नगराध्यक्षपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीमध्येच पडलेल्या दोन गटांचा फायदा काँग्रेसने उचललाय. राष्ट्रवादीने बजावलेला व्हीप झुगारून आमदार दीपक केसरकरांना डावलत राष्ट्रवादीच्या नाराज गटाने काँग्रेसच्या पाठिंब्यावर पूजा कर्पे यांना नगराध्यक्ष केलं.

 

नारायण राणे यांनी ही फूट घडवून आणली असा आरोप करत पैसे आणि दहशतवादाच्या विरोधात आपल्याला पुन्हा एकदा लढा उभारावा लागेल असा इशारा दीपक केसरकर यांनी दिलाय. तर स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी केसरकरांना अपरीपक्व आमदार म्हणून खिजवलंय.

 

वेंगुर्ले नगरपालिकेत राष्ट्रवादीचे 12 , काँग्रेस एक, मनसेचा एक, अपक्ष एक तर भाजपचे दोन नगरसेवक आहेत. भाजपाच्या नगरसेवकांनी तटस्थ राहणं पसंत केलं. त्यामुळे मनसे आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीच्या नाराज गटाने 9 विरुद्ध 6 अशी ही निवडणूक जिंकत कर्पे यांना नगराध्यक्ष केलं. यामुळे पुन्हा एकदा वेंगुर्लेत केसरकरांच्या वर्चस्वाला राणेंकडून धक्का बसला असून हा नाराज गट काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2013 09:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close