S M L

चित्रपट महामंडळाच्या बैठकीत गोंधळ

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2013 09:34 PM IST

चित्रपट महामंडळाच्या बैठकीत गोंधळ

CHITRAPAT MAHASANGH402 ऑगस्ट : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या आजच्या वार्षिक बैठकीत चांगलाच गोंधळ झाला. कोल्हापुरमधल्या शाहू स्मारकामध्ये या वार्षिक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दुपारी सभा सुरू होताच अध्यक्ष प्रसाद सुर्वेंसह संचालक मंडळाला धारेवर धरत सदस्यांनी घोषणाबाजी केली.

 

त्यातच संचालक मिलिंद अष्टेकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चक्कर आली आणि एकच गोंधळ उडाला. महामंडळाची घटना दुरुस्ती झाली नसताना कागदपत्रं रंगवून सभासदांची दिशाभूल करण्यात आलीय असा आरोप करत सदस्यांनी अनेक विषयांवरून सत्ताधार्‍यांना धारेवर धरलं.

 

सदस्यांनी संघर्ष समिती स्थापनं केलीय. त्यामधून खर्चाच्या उधळपट्टीचा आणि पुणे कार्यालय बंद होण्याचा विषयही या सभेत चांगलाच गाजला. मात्र संचालक मंडळासमोर प्रसाद सुर्वेंनी राजीनामा सादर केल्यानंतरही त्यांनी मनोगतामधून अपशब्द वापरल्याचा आरोप सदस्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2013 09:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close