S M L

कांदा करणार वांदा, क्विंटलला 3 हजार भाव

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2013 07:56 PM IST

Image img_172612_onion_240x180.jpg05 ऑगस्ट : यंदा पुन्हा एकदा कांदा रडवणार असं चित्र आहे. नाशिकच्या घाऊक बाजारात आज कांद्याचा उच्चांकी दरानं लिलाव झाला. सरासरी 3 हजार रुपये क्विंटल हा सर्वाधिक दर आज फुटला. आतापर्यंत घाऊक बाजारात कांदा 26-27 रुपये किलो या दरानं लिलाव झाले होते. पण हा भाव आज 30 रुपयांवर पोहोचला. मनमाड बाजार समितीत 3 हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. उन्हाळ कांद्याची तूट आणि पोळ कांद्याची प्रतिक्षा यामुळे कांद्याचे भाव वाढत चालले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2013 07:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close