S M L

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Aug 6, 2013 07:53 PM IST

Image img_234102_thanerapecase_240x180.jpg06 ऑगस्ट : अहमदनगरमध्ये एका दलित अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली. श्रीगोंदा तालुक्यातल्या चोंभळी गावात ही घटना घडली. या प्रकरणी मुख्य आरोपी राहुल गायकवाड सह चौघांना अटक करण्यात आलीय.

आरोपी राहुल गायकवाडने एका अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यातून तिचा जबरदस्तीनं गर्भपात करण्यात आला. राहुल आणि त्याच्या साथीदारांनी या मुलीचं आणि तिच्या आईचं अपहरणही केलं. या नराधमांच्या तावडीतून सुटलेल्या मुलीने आणि तिच्या आईने पोलिसात धाव घेतली.

दलित समाज संघटनांनी दबाव आणल्यानंतर राहुल प्रकाश गायकवाड, मनेश जयसिंग गायकवाड, प्रकाश गुजाबा गायकवाड या तिघांविरुद्ध बलात्कार,अपहरण आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 6, 2013 07:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close