S M L

अमरावतीत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी निदर्शनं

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2013 08:46 PM IST

अमरावतीत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी निदर्शनं

amravati andolan15 ऑगस्ट : अमरावतीत वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी रेल रोको करण्यात आला. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस बडनेरा-चांदूर रेल्वे स्थानकादरम्यान रोखून धरली.

त्यानंतर आमदार रवी राणा, नवनीत राणा यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जवाहर गेटजवळ घेराव घातला आणि वेगळ्या विदर्भाची मागणी केली.

राणा यांनी शहरातून सायकल रॅली काढली आणि जयस्तंभ चौकात एक दिवसाच्या उपोषणाला सुरुवात केलीय. या उपोषणाला रिपाइं नेते जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, आमदार अनिल बोंडे यांनी पाठिंबा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2013 08:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close