S M L

खा.खैरेंवर 100 कोटीचं कंत्राट देण्याचा आरोप

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2013 10:10 PM IST

खा.खैरेंवर 100 कोटीचं कंत्राट देण्याचा आरोप

chandrakan khaire03 सप्टेंबर : कोळसा घोटाळ्याची अनेक प्रकरणं गाजत असतानाच आता कंत्राट देण्यासाठी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी दबाव आणल्याचं प्रकरण पुढे आलंय.

 

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमीटेड म्हणजेच 'बीपीसीएल' च्या एका प्रकल्पाला कोळसा पुरवण्याचे 100 कोटींचे कंत्राट हैदराबाद इथल्या कंपनीला देण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप 'बीपीसीएल' चे चेअरमन आर. के. सिंह यांनी केलाय, तसं पत्रच त्यांनी पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांना पाठवलंय.

 

'बीपीसीएल' च्या मध्यप्रदेशातल्या एका प्रकल्पाच्या कंत्राटावरून हा वाद निर्माण झालाय. खैरे यांनी आपल्याला घरी बोलावून हे कंत्राट गंधार कोल अँड माईन्स या कंपनीला न देता हैदराबादमधल्या एमबीजी कंपनीला देण्यास सांगितले होते, असं सिंह यांचं म्हणणं आहे.

 

तर गंधार ही कंपनी निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवत होती, आर. के. सिंह यांची तक्रार आपण पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे केल्यामुळेच सिंह यांनी आरोप केल्याचं खैरे यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2013 07:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close