S M L

नाशिकमध्ये सर्व बाजार समित्या बंद, लिलाव ठप्प

नाशिकमध्ये रोज 70 ते 80 हजार टन कांद्याचे लिलाव होतात, तर 400 ते 500 टन भाजीपाल्याचे लिलाव होतात.

Sonali Deshpande | Updated On: Jun 1, 2017 01:10 PM IST

नाशिकमध्ये सर्व बाजार समित्या बंद, लिलाव ठप्प

प्रशांत बाग, 01 जून : नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या संपाचा परिणाम बाजार समितीवर पडलाय. जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बंद असल्यानं सर्व शेतीमालाचे लिलाव ठप्प झाले आहेत.

लासलगाव, मनमाड,पिंपळगाव,नाशिकसह सर्व बाजार समितीमध्ये होणारे  सर्व लिलाव ठप्प झाले आहेत.

नाशिकमध्ये रोज 70 ते 80 हजार टन कांद्याचे लिलाव होतात, तर 400 ते 500 टन भाजीपाल्याचे लिलाव होतात. या संपामुळे मुंबईकडे जाणारी भाजीपाला वाहतूक रोखली गेलीय.

या संपामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार जिल्ह्यात ठप्प झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close