S M L

नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला,दूध वाहतूक अडवली

यात दोन दुधाचे टँकर तर सात आठ आंब्याचे ट्रक्स अडवून ते बाजूला लावण्यात आले तर आंबे,चिकू,नारळ आदी विविध फळं जप्त करत ती रस्त्यावर फेकून देण्यात आली.

Sonali Deshpande | Updated On: Jun 1, 2017 11:56 AM IST

नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला,दूध वाहतूक अडवली

प्रशांत बाग, 01 जून :  शेतकरी संपाला सुरुवात होताच रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी नाशिक सापुतारा, पिंपळगाव सापुतारा, नाशिक बलसाड या गुजरातला जोडणाऱ्या मार्गांवरून होणारी भाजीपाला दूध फळं यांची वाहतूक अडवली आहे. रात्री सूचना देत वाहनं सोडली मात्र सकाळपासून सुरू असलेली वाहतूक पूर्णतः बंद केली असून ठिकठिकाणी आंबे आणि दुधाचे ट्रक अडकून पडले आहेत.

दिंडोरी इथे नाशिक सापुतारा रस्त्यावरील पालखेड चौफुलीवर शेकडो शेतकरी जमा होत त्यांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. यात दोन दुधाचे टँकर तर  सात आठ आंब्याचे ट्रक्स अडवून ते बाजूला लावण्यात आले तर आंबे,चिकू,नारळ आदी विविध फळं  जप्त करत ती रस्त्यावर फेकून देण्यात आली.

रासेगाव,पांडणे,वणी,खेडगाव,पिंप्री अचला आदी ठिकाणी भाजीपाला,फळं ,दुधाची वाहनं रोखण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 1, 2017 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close