S M L

जीएसटी लागू झाल्याने मुंबईतले जकात नाके बंद

वाशी, ठाणे, ऐरोली आणि दहिसर जकात नाक्यावर बीएमसीच्यावतीनं ही जकातवसुली सुरू होती. हे सर्व जकात नाके मध्यरात्रीपासूनच बंद करण्यात आलेत.

Sonali Deshpande | Updated On: Jul 1, 2017 12:50 PM IST

जीएसटी लागू झाल्याने मुंबईतले जकात नाके बंद

1 जूलै : 30जूनच्या मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटी लागू झाल्याने आता मुंबईतले सर्व जकात नाकेही बंद झालेत. राज्यात सर्वत्र जकात बंद झाली असली तरी मुंबईत मात्र जकात वसुली सुरू होती. मुंबई महापालिकेच्या वतीने एन्ट्री पाईंटवर हे जकात नाके सुरू होते. वाशी, ठाणे, ऐरोली आणि दहिसर जकात नाक्यावर बीएमसीच्यावतीनं ही जकातवसुली सुरू होती. हे सर्व जकात नाके मध्यरात्रीपासूनच बंद करण्यात आलेत.

जकात वसुली बंद झाल्यामुळे मुंबईत येणाऱ्या वाहतूकदारांनी आंनद व्यक्त केलाय. पण पालिकेसमोरच्या आर्थिक अडचणी मात्र, वाढण्याची शक्यता आहे कारण बीएमसीला वर्षाकाठी जकात वसुलीमार्फत तब्बल 6 हजार कोटीचं उत्पन्न मिळत होतं. पालिकेसाठी हा सर्वात मोठा आर्थिक स्त्रोत होता.पण तोच बंद झाल्याने पालिकेला हा खड्डा नेमका कसा भरून काढायचा हा प्रश्न पालिका प्रशासनाला नक्कीच भेडसावणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2017 12:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close