S M L

मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

"सुर्यवंशी यांच्या मुलीचं लग्न 15 दिवसांवर येऊन ठेपलं होतं. मात्र लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होऊ शकली नाही"

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2017 10:46 PM IST

मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

20 एप्रिल : हुंडयासाठी वडिलांकडे पैसे नसल्यामुळे लातूर जिल्यातील शीतल वायाळ या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आता लातूरमध्येच मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्यामुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीये.

लातूरमधील निलंगा तालुक्यातील अंबुलगा गावात अल्पभूधारक शेतकरी  शिवराज सूर्यवंशी (45) यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केलीय. सुर्यवंशी यांच्या मुलीचं लग्न 15 दिवसांवर येऊन ठेपलं होतं. मात्र लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने त्यानी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पोलीस ठाण्यात त्याच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 10:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close