S M L

पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

राज्यात तीन ते चार दिवसात पाऊस नाही पडला तर दुबार पेरणीच संकट शेतकऱ्यांवर येईल

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2017 09:25 PM IST

पावसाने फिरवली पाठ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

12 जुलै : राज्यात तीन ते चार दिवसात पाऊस नाही पडला तर दुबार पेरणीच संकट शेतकऱ्यांवर येईल अशी भीती कृषी राज्यमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केलीये.

राज्यभरात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. पण जुलै महिना मध्यावर आला तरी अजूनही राज्यभरात हवा तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत आहे.

राज्यातील 12 जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी आहे अशी कबुली पांडुरंग  फुंडकर यांनी दिलीये. जर दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार सज्ज आहे अशी हमीही त्यांनी दिलीये. शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते उपलब्ध करून दिली जातील. बियाणे आणि खते यामधील तक्रारींसाठी समिती काम करत आहे. कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे असंही फुंडकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2017 09:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close