S M L

पीकविमा मुदतवाढीच्या बोगस जी.आर.पासून सावध राहा-महाराष्ट्र सरकार

पण याच मुदतवाढीचा एक बोगस जी.आर आलाय. या बोगस जी.आर.मध्ये ४ ऑगस्ट ही पीकविम्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याचं नमूद करण्यात आलंय.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 2, 2017 10:42 AM IST

पीकविमा मुदतवाढीच्या बोगस जी.आर.पासून सावध राहा-महाराष्ट्र सरकार

2 ऑगस्ट : पीकविमा मुदत ५ ऑगस्टपर्यंत आहे. मात्र या मुदतवाढीचा बोगस जी.आर. आल्यानं सरकारची डोकेदुखी अधिक वाढलीय.

पीकविमा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट होती. पण शासनाने अर्ज वाढवण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. पण याच मुदतवाढीचा एक बोगस जी.आर आलाय. या बोगस जी.आर.मध्ये ४ ऑगस्ट ही पीकविम्यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

तसंच बोगस जी.आरपासून सावध राहण्याबाबत सरकारने लोकांना आवाहन केलंय. शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये योग्य जी.आर.ची कॉपी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी याच परिपत्रकावरील माहिती अधिकृत समजावी असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2017 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close