S M L

कोल्हापुरात त्र्यम्बोली यात्रेचा उत्साह

पावसाळ्याच्या प्रारंभी कोल्हापूरमध्ये त्रम्बोली यात्रेचा उत्साह असतो. यंदाही कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात ही यात्रा साजरी केली.

Sonali Deshpande | Updated On: Jul 17, 2017 12:26 PM IST

कोल्हापुरात त्र्यम्बोली यात्रेचा उत्साह

संदीप राजगोळकर, 17 जुलै : जगात भारी अशी कोल्हापूरची ओळख. याच कोल्हापूरमध्ये आजही अनेक परंपरा जपल्या जातात आणि पावसाळ्याच्या प्रारंभी कोल्हापूरमध्ये त्र्यम्बोली यात्रेचा उत्साह असतो. यंदाही कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात ही यात्रा साजरी केली.

नदीच्या नवीन पाण्याची पूजा केली जाते,  त्यासाठी महिला नटूनथटून घागरी घेऊन नदीवर जातात आणि वाजत गाजत हे पाणी आणलं जातं. कोल्हापूरच्या पेठा पेठामध्ये  या त्र्यम्बोली यात्रेची धूम सुरू असते.

नदीला आलेले नवे पाणी डोक्यावर घेऊन ते त्रंबोली देवीला अर्पण करून नंतर एकत्रित मांसाहारी जेवण करत शहरातील ग्रामीण बाज आणि एकोपा या यात्रेच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या जपला जातो. पी ढबाक हे खास वाद्य वाजवत आणि लेझीम खेळत या यात्रेचा उत्साह द्विगुणित होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close