S M L

कोकणात सुरू आहे 'आगोटीची बेगमी'

पावसाळ्यात 4 महिने मासेमारी बंद असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची घरात बेगमी केली जाते.

Sonali Deshpande | Updated On: May 15, 2017 03:37 PM IST

कोकणात सुरू आहे 'आगोटीची बेगमी'

चंद्रकांत बनकर, 15मे :  कोकणात सध्या 'आगोटीची बेगमी' सुरू आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आगोटीची बेगमी म्हणजे काय? तर पावसाळ्यात 4 महिने मासेमारी बंद असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी  सुक्या मासळीची घरात बेगमी केली जाते.

आठ महिने खोल समुद्रात जाऊन मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना पावसाळ्याचे चार महिने मासेमारी थांबवावी लागते. या काळात कोळी बांधव इथल्या खवय्यांना सुके मासे  मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतात. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्यानं इथल्या लोकांची झुंबड उडते ती सुके मासे खरेदी करण्यासाठी. कोळी बांधव आणि भगिनी गावागावात जाऊन सुके मासे विकतात.

सुक्या माशांमध्ये  बोंबील, सुकट, आंबडकाड, खारेमासे , बगी, सोडे , कापलेली ढोमी, कापलेली बगी या माशांना मोठी मागणी आहे.

पावसाळ्यापूर्वी खरेदीचा एक भाग म्हणून सुक्या माश्यांकडे पाहिलं जातं. पावसाळ्याच्या काळात फक्त कोकणवासियांनाच नाही तर राज्यभरातल्या खवय्यांना सुक्या माश्यांची चव हवीहवीशी वाटते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2017 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close