S M L

"कर्जमाफीच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापूजेपासून रोखणार"

"जर शेतकऱ्याकडे पैसे असते तर तुमची कर्जमाफी नको होती मात्र दीड लाखाची शासनाची कर्जमाफी मिळवायची असेल तर सर्व कर्जफेडा ही अट जाचक अट आहे."

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2017 02:27 PM IST

02 जुलै : राज्य शासनाच्या या फसव्या कर्जमाफीचा निषेध म्हणून आषाढी वारीच्या महापुजेला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूजेपासून रोखणार असल्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक भैया देशमुख यांनी दिलाय.

सध्या राज्य सरकारने जी शेतकरी कर्जमाफी केलीय ती फसवी आहे. जर शेतकऱ्याकडे पैसे असते तर तुमची कर्जमाफी नको होती मात्र दीड लाखाची शासनाची कर्जमाफी मिळवायची असेल तर सर्व कर्जफेडा ही अट जाचक अट आहे. म्हणून या फसव्या कर्जमाफ़ी निषेधार्थ आषाढी वारीच्या महापुजेपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनहीत शेतकरी संघटना रोखणार असल्याचं संघटनेचे संस्थापक भैया देशमुख यांनी जाहीर केलं.

तसंच सुकाणु समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी आणि राज्यातील लाखो वारकरी शेतकऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय.

(संग्रहित छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close