S M L

नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर खंडणीचा गुन्हा दाखल

सुहास कांदेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय

Sachin Salve | Updated On: Apr 3, 2017 09:17 PM IST

नाशिक : शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखावर खंडणीचा गुन्हा दाखल

03 एप्रिल : अजय जाखडी अपहरण प्रकरणी नाशिकचा शिवसेना जिल्हाप्रमुख सुहास कांदेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडालीये.

गंगापूररोड येथे राहणारे अजय जाखडी हे 28 मार्चपासून बेपत्ता आहे. 30 लाखांच्या वसुलीसाठी अजय जाखडीचं अपहरण करण्यात आल्याचं उजेडात आलं.  या प्रकरणी एक आरोपी विलास हिरेला अटक करण्यात आली. तर  सुहास कांदेसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अजय जाखडी यांनी व्याजाने कांदे यांच्याकडून तीस लाख रुपये घेतले होते. या रकमेची परतफेडदेखील करण्यात आली आणि रकमेवरील तीन लाख ७५ हजार रुपये व्याजाच्या रकमेपैकी एक लाख पाच हजार रुपयेही जाखडी यांनी संबंधितांना दिले. उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी  कांदे आणि त्यांचे साथीदारांनी जाखडी यांने अपहरण केल्याची फिर्याद त्यांची पत्नी उमा जाखडी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली.

कोण आहे सुहास कांदे

- सध्या शिवसेना जिल्हाप्रमुख

- जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष

- अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

- नाशिक वाहन जळीत कांडात आरोपी

- सबळ पुराव्याअभावी झाली निर्दोष मुक्तता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 09:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close