S M L

अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू 8 रुपयांवरून 10 रुपयांवर

हरभरा डाळीचे दर वाढल्यानं लाडू प्रसादाच्या किमतीमध्ये ही वाढ करण्यात आलीय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 20, 2017 01:48 PM IST

अंबाबाईच्या प्रसादाचा लाडू 8 रुपयांवरून 10 रुपयांवर

संदीप राजगोळकर,20 एप्रिल : महागाईचा फटका सर्वसामान्यांना कायमच बसतो.आता याच महागाईचा फटका करवीर निवासिनी अंबाबाईच्या भक्तांनाही बसलाय. कारण देवीचा लाडू प्रसाद आता 8 रुपयांवरुन 10 रुपये करण्यात आलाय.हरभरा डाळीचे दर वाढल्यानं लाडू प्रसादाच्या किमतीमध्ये ही वाढ करण्यात आलीय.

कोल्हापूरमधल्या कळंबा कारागृहातून देवस्थान समितीला लाडू प्रसादाचा पुरवठा केला जातो. कळंबा कारागृहातील कैदी हे लाडू तयार करतात. या लाडूचं वजन हे 50 ग्रॅम असतं. गेल्या वर्षभरापासून लाडू प्रसादाचा हा ठेका कारागृहाकडे देण्यात आला होता. त्यावेळी लाडूची किंमत ही 8 रुपये होती.

पण सध्या डाळींचे दर वाढलेत. त्यातच हरभरा डाळीचेही दर वाढल्यानं प्रसादाचा दरही वाढवण्यात आल्याची माहिती कळंबा कारागृहाचे अधिक्षक शरद शेळके यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close