S M L

कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कांद्याला सव्वा रुपया भाव !

कांद्याला सरासरी 525 रुपये तर कमीत कमी 125 रुपये प्रति क्विंटल अर्थात 1 रुपया 25 पैसे किलो भाव मिळाला.

Sachin Salve | Updated On: Jun 21, 2017 06:00 PM IST

कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कांद्याला सव्वा रुपया भाव !

21 जून : देशात सर्वात मोठी मानल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज  कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात खाली आले असून कांद्याला सरासरी 525 रुपये तर कमीत कमी 125 रुपये प्रति क्विंटल अर्थात 1 रुपया 25 पैसे किलो भाव मिळाला.

कष्टाने पिकविलेल्या कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या लासलगाव, मनमाड,येवला,चांदवड, नांदगाव यासह नाशिक जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

एकीकडे आवक जास्त तर दुसरीकडे मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कांद्याचे भाव घसरले. आज लासलगाव बाजार समितीत 20 हजार क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची आवक झाल्यानंतर कांद्याला सरासरी 525 रुपये तर कमीत कमी 125 रुपये प्रति क्विंटल अर्थात सव्वा रुपया किलो भाव मिळाला.

सध्या कांद्याला मिळत असलेल्या भावात पिकावर केलेला खर्च तर सोडाच बाजार समितीत लिलावसाठी कांदा आणल्या नंतर वाहतुकीवर केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याचे पाहून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close