S M L

पेट्रोलपंपावर मापात पापकरून दिवसाला 15 ते 20 हजारांची लूट !

पेट्रोल पंपावर इलेक्ट्राॅनिक चीप वापरून ग्राहकांना कमी इंधन देणाऱ्या राज्यभरातल्या ७२ पंपांवर आतापर्यंत ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने कारवाई केली आहे.

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2017 02:39 PM IST

पेट्रोलपंपावर मापात पापकरून दिवसाला 15 ते 20 हजारांची लूट !

02 जुलै : पेट्रोल पंपावर मापात पाप करून ग्राहकांना कमी इंधन देणाऱ्या पेट्रोलपंपचालकांचा नुकताचं ठाणे पोलिसांनी पदार्फाश केलाय. हे पेट्रोपचालक दिवसाला कमीत कमी 15 ते 20 हजारांची लूट करत असल्याची बाब आता चौकशीतून समोर आलीये.

पेट्रोल पंपावर इलेक्ट्राॅनिक चीप वापरून ग्राहकांना कमी इंधन देणाऱ्या राज्यभरातल्या ७२ पंपांवर आतापर्यंत ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने कारवाई केली आहे. या कारवाईनंतर पेट्रोल पंपावर इंधन चोरी किती मोठ्या प्रमाणात केली जातेय याचा अंदाज घेतला जाऊ शकतो.

नागपूरच्या जरिपटक्यातील योगीराज समर्थ पंपाच्या दोन डिस्पेसर युनिटमध्ये इलेक्ट्राँनिक चीप पोलिसांनी जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे हे पंप मालक दररोज जवळपास पंधरा ते वीस हजार रुपयांची इंधनाची चोरी करत असल्याचं क्राईम ब्रांचच्या तपासात उघड झालं आहे.

ठाणे क्राईम ब्रांचनं पेट्रोल पंप मालकांना इलेक्ट्राॅनिक चीप विकणाऱ्या विवेक शेट्टे नावाच्या आरोपीला अटक केली होती. या आरोपीच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आलीय.

राज्यातील आणि राज्याबाहेरील पेट्रोल पंपावर धडक कारवाई  केली जात आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या चोरीचा डेमोही दाखवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2017 02:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close