S M L

बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणणं पडणार महागात

बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी लोकप्रतिनिधींना आता आपलं मराठी प्रेम दाखवणे अंगलट येणार आहे. कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी तसा इशारा देखील दिलाय.

Sonali Deshpande | Updated On: May 22, 2017 05:46 PM IST

बेळगावात मराठी लोकप्रतिनिधींना जय महाराष्ट्र म्हणणं पडणार महागात

संदीप राजगोळकर,22 मे : बेळगावसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठी लोकप्रतिनिधींना आता आपलं मराठी प्रेम, महाराष्ट्र प्रेम दाखवणे अंगलट येणार आहे. कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी तसा इशारा देखील दिलाय.

कर्नाटक सरकार आगामी अधिवेशनात कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक कार्यक्रमात, सभागृहात जय महाराष्ट्र म्हटल्यास किंवा कर्नाटक राज्य विरोधी घोषणा दिल्यास त्याचं पद सदस्यत्व रद्द करणार असा नवीन कायदा अमलात आणणार आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या रोशन बेग यांनी ही माहिती पत्रकारांना दिलीय.

बेळगाव महापालिका सभागृहात याबाबत मंगळवारी बैठक घेणार असल्याचं देखील रोशन बेग यांनी स्पष्ट केलं आहे. एकीकडे अल्पसंख्यांक घटनात्मक अधिकार देण्यास टाळाटाळ सुरू असताना एकीकरण समितीच्या लोक प्रतिनिधींची गळचेपी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2017 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close