S M L

भीषण अपघातात काँग्रेसचे महाराष्ट्र सेक्रेटरी संजय चौपाणे यांचा जागीच मृत्यू

या अपघातात काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव संजय चौपाणे यांचा जागीच मृत्यू झाला. याच अपघातात ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, रमाकांत म्हात्रे, बलदिप सिंह बिस्त जखमी झाले आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Aug 13, 2017 09:16 PM IST

भीषण अपघातात काँग्रेसचे महाराष्ट्र सेक्रेटरी संजय चौपाणे यांचा जागीच मृत्यू

औरंगाबाद, 13 आॅगस्ट : औरंगाबाद-गंगापूर रोडवरील भेंडाला फाटा येथे बस-स्कॉर्पिओमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव संजय चौपाणे यांचा जागीच मृत्यू झाला. याच अपघातात ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, रमाकांत म्हात्रे, बलदिप सिंह बिस्त जखमी झाले आहेत.

संजय चौपाणे हे औरंगाबादमध्ये इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या कार्यक्रमाला आले होते. इंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याची सुरुवात औरंगाबादेतून करण्यात आली आहे. या सोहळ्यात काँग्रेसचे गुलामनबी आझाद, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मोहन प्रकाश यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 09:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close