S M L

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पुण्याकडे

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आज गांधीवाड्यातून पुण्याकडे प्रस्थान ठेवलं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2017 12:34 PM IST

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पुण्याकडे

18 जून : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आज गांधीवाड्यातून पुण्याकडे प्रस्थान ठेवलं. माऊली कालच्या प्रस्थानानंतर आपल्या आजोळघरी म्हणजे गांधीवाड्यात मुक्कामाला होत्या, तर संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डीवरून पुण्याकडे प्रस्थान ठेवेल.

दोनही पालख्यांचा संगम पुण्यातल्या मरीआई गेटजवळ होणार आहे. त्यानंतर पुढची दोन दिवस पालख्या पुण्यात मुक्कामाला असतील, माऊलींच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरात तर तुकोबांच्या पालखीचा मुक्काम निवडुंगा विठोबा मंदिरात असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 12:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close