S M L

कर्जमुक्तीसाठी आज शिवसेनेचं तिसरं मोठं आंदोलन

शिवसेना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता आंदोलन करणार आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 11, 2017 08:37 AM IST

कर्जमुक्तीसाठी आज शिवसेनेचं तिसरं मोठं आंदोलन

11 सप्टेंबर: शिवसेना आज राज्यभर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीसाठी तिसरं आंदोलन करणार आहे. सरकारने कर्जमुक्तीची घोषणा याच वर्षी २४ जून रोजी केली होती. त्याला आता तीन महीने होत आले तरी देखील अजून कर्जमुक्तीची अंमलबजावणी झालेली नाही.

दसऱ्यापूर्वीच राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून मोठा दिलासा द्यावा आणि त्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी शिवसेना करणार आहे. शिवसेना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये दुपारी १२ वाजता आंदोलन करणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार आणि सर्व पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत. मुंबईतही शिवसेनेचे मंत्री आणि आमदार मुख्यमंत्र्यांना भेटून कर्जमुक्तीची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी असं निवेदन देणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2017 08:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close