S M L

संभाजी बिग्रेडचा विरोध झुगारून कोपर्डीत उभारला 'निर्भया'चा पुतळा

पीडितेच्या कुटुंबियांनी गुरुवारी मध्यरात्री पीडितेचा पुतळा याठिकाणी उभारलाय

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2017 11:05 PM IST

संभाजी बिग्रेडचा विरोध झुगारून कोपर्डीत उभारला 'निर्भया'चा पुतळा

14 जुलै : कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर निर्भयाचा पुतळा उभारण्यात आलाय.

कोपर्डी प्रकरणाला वर्ष पूर्ण झालंय. पण अजूनही निर्भयाला न्याय मिळाला नाही. तिच्या आठवणीत एक स्मारक उभं करण्याचा निर्णय पीडितेच्या कुटुंबियांनी घेतला होता. मात्र हे स्मारक नक्की कुणाला आणि काय प्रेरणा देणार अशी भूमिका मांडत संभाजी ब्रिगेडने या स्मारकाला विरोध दर्शवला होता.

त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांनी गुरुवारी मध्यरात्री पीडितेचा पुतळा याठिकाणी उभारलाय. संभाजी ब्रिगेडचा विरोध झुगारून हा पुतळा उभरण्याचा निर्णय पीडितेच्या कुटुंबियांनी घेतल्यानं संभाजी ब्रिगेड काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 10:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close