S M L

टोल दिला नाही म्हणून ट्रकचालकाचा पाठलाग करून बेदम मारहाण

टोल नाक्यावरील कर्मचारयांनी ट्रकचा पाठलाग करुन चालकाला पकडले आणि टोल नाक्याच्या कार्यालयात आणून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2017 09:02 PM IST

टोल दिला नाही म्हणून ट्रकचालकाचा पाठलाग करून बेदम मारहाण

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

26 जून :  कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाक्यावर ट्रक चालकाने 100 रुपयाचा टोल दिला नाही म्हणून टोलच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग त्याच्यावर जीवघेणा हल्ला केलाय. या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून गेले तीन दिवस त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

शिराळा तालुक्यातील संजय भीमराव कडवेकर हे ट्रक चालक पुणे-बेंगलोर महामार्गावरील किणी टोल नाक्यावरुन शनिवारी ट्रक घेऊन कोल्हापूरकडे निघाले होते. टोलनाक्यावर टोल न भरता ते कोल्हापूरकडे गेले. टोल नाक्यावरील कर्मचारयांनी ट्रकचा पाठलाग करुन चालकाला पकडले आणि टोल नाक्याच्या कार्यालयात आणून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.

यामध्ये संजय गंभीर जखमी झाले. त्यानंतर संजय यांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या भावाला फोन करुन त्यांना नेण्यास सांगितलं. संजय यांचे भाऊ पोपट कवडेकर यांनी त्यांना अॅम्बुलन्सने कोल्हापूरला आणून खासगी रुग्णालयात दाखल केलं आहे. संजय यांच्या गुप्तांगावर जबर मार बसल्याने ते अत्यवस्थ आहेत. शंभर रुपयांचा टोल त्यांच्या जीवावर बेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 06:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close