S M L

कर्जमाफीचा 'पारदर्शक' हिशेब द्या, उद्धव ठाकरेंची मागणी

कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची यादी दिली नाही तर सरकारवर विश्वास ठेवायचा कसा असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय

Sachin Salve | Updated On: Jun 26, 2017 09:02 PM IST

कर्जमाफीचा 'पारदर्शक' हिशेब द्या, उद्धव ठाकरेंची मागणी

26 जून : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने पारदर्शक कारभाराचा मुद्दा उपस्थिती केला होता. आता शिवसेनाही पारदर्शकतेची मागणी करू लागलीये. सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीचा हिशेब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मागितलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या संवाद यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद संवाद साधला.  शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात सरकारनं पूर्ण आकडेवारी दिलीय, त्याच्यावर विश्वास ठेवायचा कसा ? असा सवाल करत  कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमाफीनंतर कोरा झाला याचीही माहिती सरकारने द्यावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीये. तसंच यासाठी तातडीनं अभ्यासगट तयार करावा अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

तसंच कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची यादी दिली नाही तर सरकारवर विश्वास ठेवायचा कसा असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय. शेतकरी कर्जमाफीनंतर शिवसेनेचा विरोध मावळेल असा भाजपचा अंदाज होता. पण तोही फोल ठरलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 26, 2017 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close