S M L

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली नाही तर लढा अटळ- उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांसाठी 'मी कर्जमुक्त होणारच' ही मोहीम शिवसेना सुरू करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आता ही शेवटची लढाई, असंही ते म्हणाले.

Sonali Deshpande | Updated On: May 7, 2017 06:13 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली नाही तर लढा अटळ- उद्धव ठाकरे

07 मे : शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली नाही तर लढा अटळच आहे, असं सांगत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय.  औरंगाबादमध्ये ठाकरे बोलत होते.

'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी वेळ मागितली होती. पण आता महिना झाला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी सरकारनं कर्जमुक्ती दिलीच पाहिजे,' अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीये.

शेतकऱ्यांसाठी 'मी कर्जमुक्त होणारच' ही मोहीम शिवसेना सुरू करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. आता ही शेवटची लढाई, असंही ते म्हणाले.

सरकारनं ऐकलं नाही तर लढा होणारच, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close