S M L

राज्यात उन्हाचा पारा चढताच, कोल्हापुरातही उष्माघातानं एकाचा बळी

बीड आणि धुळे पाठोपाठ आता कोल्हापुरातही उष्माघाताचा एक बळी गेला आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 3, 2017 10:08 AM IST

राज्यात उन्हाचा पारा चढताच, कोल्हापुरातही उष्माघातानं एकाचा बळी

03 एप्रिल : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढत असून उष्माघाताने मृत्यूमुखी पडलेल्यांच्या संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बीड आणि धुळे पाठोपाठ आता कोल्हापुरातही उष्माघाताचा एक बळी गेला आहे.

कोल्हापुरातल्या शाहूपुरी कुंभार गल्ली परिसरात राहणारे 50 वर्षीय शामराव सुतार हे काल उष्माघातानं दगावले. दिवसभर फरशी बसवण्याचं काम केल्यानंतर ते रात्री कोल्हापुरातल्या शेळके पुलाच्या कट्ट्यावर बसले होते. तिथंच त्यांचा मृत्यू झाला.

शामराव सुतार यांना वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होतं. तेव्हा ते उष्माघातानं दगावल्याचं स्पष्ट झालं. गेल्या 6 दिवसांपासून कोल्हापूरच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. सध्या इथं 38 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे.

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 10:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close